पत्नीला बेदम मारहाण करणार्‍या सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरूध्द गुन्हा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पत्नीला लाथा-बुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या बंडगार्डन पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह यांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास भीमराव देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुधीर विठ्ठलराव भवर (३९, रा. हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली) यांनी फिर्याद दिली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एपीआय देशमुख यांच्या पत्नी माहेरी गेल्या होत्या. १६ मे २०१९ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास सुधीर त्यांच्या बहिणीला घेऊन सासरी सोडण्यासाठी आले. देशमुख हे भोसरीमधील अधिकारी निवास पोलिस लाईन येथे राहतात. त्यावेळी देशमुख यांनी सुधीर यांना शिवीगाळ केली.

तसेच सुधीर यांच्या बहिणीला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने डोक्यात मारले. यामध्ये सुधीर यांची बहिण गंभीर जखमी झाली. याबाबत सुधीर यांनी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हट्टा पोलीस ठाण्यातून हा गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. तपास पोलिस करत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त  – 

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

Loading...
You might also like