पैसे मागितल्याने लाथा बुक्क्यांनी मारले, भाजप नगसेवकाच्या भावावर गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – साईटवर काम केलेल्या कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून भाजप नगरसेवकाच्या भावाने एकाला मारहाण करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरसेवकाच्या भावासह ७ ते ८ जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माणिक वाघेरे (पिंपरी गाव) व त्यांच्या ७ ते ८ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चंदू इस्राफील मंडल (३९, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदू मंडल यांनी दर्वेश कन्स्ट्रक्शनच्या साई विहार अपार्टमेंटच्या आरसीसीचे काम केले  होते. त्यांनी माणिक वाघेरे यांना या कामाचे पैसे मागितले. त्या कारणावरून त्यांनी मंडल यांना फोन करून शिवीगाळ केली. त्यानंतर ७ ते ८ जणांना आणून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत माझ्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एच. पी. बांगर करत आहेत.

माणिक वाघिरे हे विद्यमान भाजप नगरसेवकाचे भाऊ आहेत.

Loading...
You might also like