Coronavirus : ‘कोरोना’ची बाधा झालीच नव्हती पण  प्रशासनानं  जाणीवपूर्वक रुग्णालयात ठेवलं, FB Live करून दावा करणार्‍या ‘जमीरऊल मोहम्मद’ विरुद्ध FIR दाखल

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनातून बरा होऊन रुग्णालयातून बाहेर पडलेल्या एकाने त्याला कोरोनाची बाधा झालीच नव्हती,  प्रशासनाने  जाणीवपूर्वक रुग्णालयात ठेवले होते, असा दावा फेसबूक लाईव्हद्वारे केले. त्यामुळे संबंधित रुग्णाला  प्रशासनाने पुन्हा ताब्यात घेउन 14 दिवसांकरिता विलगीकरणात ठेवले. त्यानंतर शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

जमीरऊल जफीरऊल मोहम्मद   रा. (तकिया दिवानशाह, मोमीनपुरा) असे आरोपीचे नाव आहे. जमीरऊल  टोपी विकण्याचा व्यवसाय करतो. 13 मार्चला तो टोपी खरेदीसाठी दिल्लीला गेला होता. 15 मार्चला तो नागपुरात परतला. दरम्यान त्याच्या प्रवासाची माहिती समजतात प्रशासनाने त्याला ताब्यात घेऊन विलगीकरण केंद्रात ठेवले. त्याचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार केल्यानंतर तो बरा झाला. त्यामुळे शुक्रवार  त्याची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याने फेसबूक लाईव्ह करून आपल्याला काहीच झाले नव्हते,  जाणीवपूर्वक मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते, अशी अफवा पसरविली होती.

रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर त्याला घरातच विलगीकरणात राहण्याचे आदेश दिले असतानाही तो लोकांमध्ये मिसळला होता. त्याला कोरोनाचे निदान झाल्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सुविधांचा अभाव असल्याची माहिती देण्यासाठी त्याने रुग्णालयातून फेसबूक लाईव्ह केले होते. त्यावेळी प्रशासनाने त्याला तंबी दिली होती. त्यानंतरही त्याची मुजोरी कायम होती.