जर्मनीतील IT इंजिनिअर महिलेची पुण्यात पतीविरुद्ध छळ केल्याची तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तो मुळचा केरळचा तर ती पुण्याची. त्यांचे लग्न पुण्यात झाले. त्यानंतर ते दोघेही जर्मनीला आय टी इंजिनिअर म्हणून काम करतात. मात्र, पती दारु पिऊन येऊन किरकोळ गोष्टीवरुन आपल्याला शिवीगाळ करुन मारहाण करतो, शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद महिलेने पतीविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात केली आहे.

परदेशात नोकरी करणारा मुलगा पाहिल्यावर आजही त्याला जावई करुन घेण्यासाठी वधूच्या आईवडिलांच्या उड्या पडतात. पण तिकडे मुलाची वागणूक कशी आहे. त्याची माहिती घेतली जात नाही. त्यामुळे लग्नानंतर मुली परदेशात गेल्यावर त्यांचा भ्रमनिराश होण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे. त्यानंतर ते पोलिसांकडे धाव घेतात. निगडी पोलिसांनाही हा अनुभव आला.

एका ३८ वर्षाच्या महिलेने निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली असून त्यावरुन पोलिसांनी वरुण कुन्हाली सोमासुंदरम (वय ३५, रा. मिरकोर्टस्ट्रास बॉईल, बॉन, जर्मनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ते दोघेही आय टी इंजिनिअर म्हणून सध्या जर्मनीत काम करतात. त्यांचे दोन वर्षांपूर्वी पुण्यात लग्न झाले होते. त्यानंतर ते नोकरीनिमित्त जर्मनीतील बॉन शहरात रहायला गेले. तेथे गेल्यावर या महिलेला वरुणचा खरा स्वभाव लक्षात आला. दोन वर्षे शारीरिक व मानसिक त्रास सहन केल्यानंतर तो असहाय्य झाल्यावर तक्रार दिली. वरुण दारु पिऊन घरी आल्यावर किरकोळ गोष्टीवरुन त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करीत असे. वरुण सोमासुंदरम हा सध्या जर्मनीत आहे. सहायक पोलीस निरीक्षक आरदवाड अधिक तपास करीत आहेत.

Loading...
You might also like