२० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा

अकोट : पोलीसनामा ऑनलाईन – फौजदारी कारवाईची धमकी देत ती टाळण्यासाठी महिलेकडे २० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हशमत खान दाऊदखान पठाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

अकोट ग्रामीण मधील पोपट खेड बीटमध्ये तक्रारदार महिला व तिचत्या कुटुंबातील ३ जणांवर पोलीस हेडकॉन्सटेबल हशमत खान दाऊदखान पठाण याने फौजदारी कारवाई करण्याची धमी दिली. त्यानंतर ती कारवाई न करण्यासाठी त्याने २० हजार रुपयांची मागणी केली. परंतु महिलेची लाच देण्याची इच्छा नसल्याने तिने लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली.

त्यानंतर अँटी करप्शनच्या पथकाने याप्रकरणी पडताळणी करून सापळा रचला. परंतु पठाणला महिलेवर संशय आला आणि त्याने रक्कम स्विकारली नाही. त्यानंतर तो एसीबीच्या पथकाच्या हाती लागला नाही. परंतु त्याचा शोध सुरु आहे. त्याच्यावर लाचलचुपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ तसेच भादंवि ३८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.