‘ती’ पोस्ट टाकून विधानसभा उपाध्यक्षांची बदनामी केल्याप्रकरणी ‘त्या’च्या विरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात संदीप साबळे (रा. रुईछत्रपती, ता. पारनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप साबळे याने औटी यांना उद्देशून रुई छत्रपती येथील छावण्यांमध्ये सुरू असलेले घोटाळे दिसत नाहीत का ? अशी पोस्ट टाकली होती. औटी यांनी शनिवारी (दि.11) रात्री उशिरा सुपा पोलिस ठाण्यात संदीप साबळे याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले हे करीत आहेत.

नेमकी काय केली बदनामी ?

पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती येथे दोन चारा छावण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. या छावण्यांमध्ये मोठा घोटाळा सुरू असून, नगरचे कलेक्टर, पारनेरचे तहसीलदार, पारनेरचे नामदार झोपलेत का ? हे त्यांना दिसत नाही का ? अशा प्रकारची पोस्ट ना. औटी यांच्या वैयक्‍तिक फेसबुक अकांऊटवर आली होती.

Loading...
You might also like