५० हजारांची लाच घेताना खासगी व्यक्तीसह ‘SDO’च्या पतीवर गुन्हा

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – महामार्गाच्या रुंदीकरणासाठी मंजूर झालेली रक्कम खात्यात जमा करण्यासाठी २ टक्के लाचेपैकी पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारताना एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून अहमदपूरच्या एसडीओ आंधळे यांचा पती पळून गेला आहे.

डॉ. विशाल फुलारी (वय ३५, रा. अहमदपूर) असे त्यांचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ज्योतीराम ज्ञानोबा फुलारी (वय २६, रा. घरणी, ता. चाकूर, जि़. लातूर) या खासगी व्यक्तीला अटक केली आहे.

तक्रारदार यांचे वडिलांचे नावे आष्टामोड येथे असलेली दोन मजली इमारती ही महामार्गाच्या कामासाठी संपादित करण्यात आली आहे. त्याची नुकसान भरपाईची रक्कम ५६ लाख ९७ हजार ६७७ रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. ही रक्कम जमा करण्यासाठी ज्योतिराम फुलारी याने अहमदपूर एसडीओ आंधळे यांचे पती डॉ. विशाल फुलारी यांची माझी ओळख आहे, असे सांगून तुमचे मंजूर झालेली रक्कम खात्यावर जमा करण्यास सांगतो, म्हणून २ टक्के प्रमाणे १ लाख १२ हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने तक्रार केल्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यावेळी त्याने तडजोड करुन १ लाख रुपये घेण्याचे व त्यातील ५० हजार रुपये लगेच व उरलेले ५० हजार रुपये उदया घेण्याचे मान्य केले. तसेच विशाल फुलारी यांनी ही लाचेची रक्कम घेण्यास फोन वरुन सहमती देऊन प्रोत्साहन दिले होते. त्यानंतर पोलिसांनी रविवारी दुपारी सापळा लावून तक्रारदाराकडून ५० हजार रुपये घेताना त्योतिराम फुलारी यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर विशाल फुलारी हे फरार झाले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

योगासनांमध्ये ‘सातत्य’ असणे फायद्याचे

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

Loading...
You might also like