खळबळजनक ! विनयभंग प्रकरणी भाजपच्या 2 नगरसेवकांविरुद्ध FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन – देवपूर भागातील एका नगरसेवकाने महिलेकडे छायाचित्राची मागणी करीत हात धरुन विनयभंग केला. तर दुसर्‍या नगरसेवकाने या प्रकाराची वाच्यता करु नये म्हणून धमकाविल्यामुळ पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय जनता पक्षाच्या दोन नगरसेवकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवपूर येथील रहिवासी असलेल्या महिलेला 5 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास चालली होती. त्यावेळी नगरसेवक नरेश चौधरी यांनी रस्त्यावर अडवून तिचा हात धरला. यापूर्वी देखील त्याने मोबाईलवर वेळोवेळी संपर्क करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे. प्रकाराची कुठेही वाच्यता करु नये म्हणून त्या महिलेला दुसर्‍या नगरसेवकाने धमकावले. यावरुन नगरसेवक नरेश चौधरी, नगरसेवक भगवान गवळी आणि सरदारमल चौधरी या तिघांविरुध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, नगरसेवक चौधरी आणि गवळी यांनी हे सूडाचे राजकारण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही प्रभाग क्रमांक एकमधील नगरसेवक आहोत. जनतेच्या समस्या सोडविणे हे आमचे कर्तव्य आहे. संबंधित महिलेला आम्ही भेटलेलोही नाही. त्या भागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तिने आमच्याशी संपर्क साधला होता. ती समस्या आम्ही तातडीने सोडविली होती. परंतु, आता त्या महिलेच्या आडून कोणीतरी सूडाचे राजकारण करीत आहे. आम्हांला खोटया गुन्ह्यामध्ये अडकविण्याचे राजकीय षडयंत्र रचले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.