कोणत्या उमेदवारावर किती गुन्हे, मतदान केंद्राबाहेर झळकवला बोर्ड

सांगली: पोलीसनामा आॅनलाईन
सांगलीमध्ये मतदान केंद्रावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीचा घोषवारा लावण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ज्या प्रभागात जे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्या सर्व उमेदवारांची माहिती मतदारांना दिली आहे. या बोर्डावर उमेदवाराचे नाव, त्याचं शिक्षण, उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांच्याकडे असणारी संपत्ती सा सर्व गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.
 [amazon_link asins=’B07CC1X3DY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89468d9d-9573-11e8-91a2-d3fa5b13783e’]
मतदान केंद्रावर लावलेल्या बोर्डाचा चांगलाच प्रभाव मतदाना दिवशी होत असल्याचे दिसत आहे. या बोर्डवरील ही सर्व माहिती वाचून काही मतदार मतदान करण्यास जात असल्याचे चित्र मतदान केंद्रावर पाहायला मिळतेय. सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची वेळ आहे. आजच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रांचं काल दुपारी वाटप करण्यात आलं होतं. सांगलीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी आहे,तर भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहे.