पोलीसाचे अपहरण करुन पोलीसाला बेदम मारहाण ; राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – केस केल्याच्या रागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस कर्मचार्‍याचे अपहरण करून लाकडी दांडके, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. मारहाणीत सदर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारहाणीत पांडुरंग म्हस्के हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. आरोपींमध्ये नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्यासह अमित गाडे, प्रताप गायकवाड व इतर चार ते पाच अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री दहा वाजता काहीजणांचे टोळके म्हस्के यांच्या घरी गेले. सदर टोळक्याने त्यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून नगरसेवक त्रिंबके यांच्या कार्यालयात अपहरण करून आणले. तू आमच्याविरुद्ध केस का केली, असे म्हणून शिवीगाळ करून दमदाटी  केली. तसेच म्हस्के यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीत म्हस्के हे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रात्री उशिरा त्यांचा जबाब तोफखाना पोलिसांनी नोंदविला आहे. त्यावरून तोफखाना पोलीस ठाण्यात नगरसेवकासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
You might also like