कलयुग ! …तर तुला ‘द्रौपदी’ होऊन राहावं लागेल, पतीनं दिली पत्नीला धमकी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – इथे राहायचं असेल तर तुला द्रौपदी होऊन राहावे लागेल, अशी धमकी देत एका नवविवाहितेला तिच्या पतीनेच घराबाहेर काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे.

या प्रकरणी नवविवाहितेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधल्या चांदखेडा परिसरात राहणाऱ्या महिलेचे महिन्याभरापूर्वीच मोठ्या धूमधडाक्यात लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर दोन तीन दिवसातच पती तिला छोट्या छोट्या कारणांवरून थेट मारहाण करू लागला. तसेच एका दिवशी पतीने तिला वडिलांच्या खोलीत जाण्यास सांगितले. तसेच तू तिथेच झोप असे म्हटले. त्यावेळी विरोध केला. तेंव्हा त्याने तिला धमकी दिली की इथे राहायचं असेल तर द्रौपदी बनून राहावे लागेल, असे म्हटले. तसेच पतीच्या मोठ्या भावानेही एका दिवशी तिच्या खोलीत येऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यावर त्याने तिला मारहाण केली. तसेच पतीला कळल्यावर तिचा पती आणि सासऱ्यांनीही तिला बेदम मारहाण करून घरातून हाकलून दिले. त्यानंतर पिडितीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.