तृतीयपंथीच्या खूनाचा १२ तासात उलगडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हांडेवाडी रोडवरील सदाशिव नगर परिसरात सोमवारी उघडकिस आलेल्या तृतीयपंथीच्या खुनाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या युनीट तीनला यश आले आहे. खुनाच्या बारा तासाच्या आत पोलिसांनी खून करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अरबाज अहमद शेख (लक्ष्मीनगर येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर अरबाज शेख उर्फ नजफ या तृतीयपंथीचा त्याने गळा चिरून निर्घृण खून केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडेवाडी रोडवरील सदाशिवनगरमधील पिंपळे इमारतीमध्ये अरबाज शेख उर्फ नजफ या तृतीयपंथीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनीट तीनकडून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला. त्यावेळी हा खून अरबाज शेख (लक्ष्मीनगर) याने केला असून तो लक्ष्मीनगर येरवडा येथे जोशी वडेवाले जवळ येणार आहे.

अशी माहिती पोलीस नाईक विल्सन डिसोजा यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिसानी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे चौकशी केल्यावर अरबाज शेख उर्फ नजफ याचा खून केल्याचे त्याने सांगितले. अरबाज शेख उर्फ नजफने त्याला तू तेरे फ्रेंड को छोड दे. मेरे को छोडा तो तेरेको बदनाम करूंगी, तेरे घरके आगे जलाके लूंगी. मिडिया बुलाउंगी. अशी धमकी दिली व टॉर्चर केले. त्यामुळे चिडून त्याच्या गळ्यावर सुरीने वार करून खून केला. असे सांगितले. त्याला वानवडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, पोलीस उपनिरीक्षक अजय म्हेत्रे, संजय गायकवाड, किरण अडागळे, सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय गरुड, कर्मचारी संतोष क्षीरसागर, मच्छिंद्र वाळके, रोहिदास लवांडे, गजानन गणबोटे, , विल्सन डिसोजा, सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली.