घरफोडीतील सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक शहरात घडलेल्या तीन घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखे युनिट १ च्या पथकाने सराईत गुन्हेगाराला अटक केली. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात यापूर्वी अटक केली होती. जामीनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा शहरामध्ये घरफोडीचे गुन्हे केले. युनिट १ च्या पथकाने शंकर नागेश पुजारी याला सपाळा रचून अटक केली असून २ लाख १९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नाशिक शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी तीन घरफोडीचे गुन्हे घडले होते. हे गुन्हे शंकर पुजारीने केल्याचा संशय पोलिसांना होता. त्याला  ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने मुंबईनाका व ओझरी याठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. हे गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा आणि गुन्ह्यातील चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ हे मुंबईनाका घरफोडीचा समांतर तपास करत होते. दरम्यान, पथकातील कर्मचारी विशाल काठे यांना संशियत पुजारी हा पेठफाटा परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, परिसरात सापळा रचण्यात आला. या सराईत गुन्हेगाराने ओझरमध्येही संशियत गणेश बाजीराव केदारेच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा (एमएच १५ इएच ००६३), मोबाईल, सोन्या-चांदीची दागिने, नाणी असा २ लाख १९ हजाराचा मुद्देमाला पोलिसांनी जप्त केला आहे. संशियत पुजारी व केदार हे अट्टल गुन्हेगार असून गेल्यावर्षी गंगापूर परिसरात केलेल्या घरफोडीप्रकरणी त्यांना आॅगस्ट महिन्यात पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडून ६६ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला होता. पुजारी हा काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता. त्यानंतर पुन्हा घरफोडी केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. केदारे हा अद्याप फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहे.