अमरावतीहून पुण्यात मांडूळ तस्करी करणाऱ्यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अमरावतीहून पुण्यात मांडूळ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट चारच्य़ा पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी मांडूळ जप्त केले.

प्रशांत देविदास डांगे (वय ४५, संभाजीनगर, यवतमाळ) व प्रमोद मानसिंग पवार (वय ३२, गांधी नगर, पिसवळी ता. कल्याण जि. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या युनीट चारचे पोलीस शिपाई राकेश खुनवे यांना येरवडा येथील जय जवान नगर येथे दोन जण मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचला आणि दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर सॅकमध्ये मांडूळ साप मिळून आला.

अमरावतीहून आणले होते मांडूळ
प्रशांत डांगे हा यवतमाळ येथील राहणारा आहे. त्याने अमरावतीच्या ग्रामीण परिसरातून मांडूळ पुण्यात विक्रीसाठी आणले होते. मानसिंग पवार हा त्याला मांडूळ विकून देणार होता. त्याचे चांगले पैसेही तो मिळवन देणार होता.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, कर्मचारी शंकर पाटील,राकेश खुनवे, गणेश साळुंखे, सचिन ढवळे, रमेश राठोड, सुरेंद्र साबळे, सागर घोरपडे, अशोक शेलार यांच्या पथकाने केली.