कुख्यात गुंडाला पिस्टलासह गुन्हे शाखेने केले जेरबंद

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन
गुन्हेगारांना शस्त्र पुरवणारा कुख्यात गुंड गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी आला असता गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाने (पश्चिम) त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पथकाने शुक्रवारी (दि.२८) कर्वेनगर येथील भुजबळ बंगला या ठिकाणी करण्यात आली. त्याच्याकडून १ लाख ७ हजार रुपये किंमतीचे ३ गावठी बनावटीचे पिस्टल, दहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
संतोष विनायक नातु (वय – ४२ रा. महर्षीनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराकडून आत्तापर्यंत १९ पिस्टल जप्त केले आहेत.
[amazon_link asins=’B01M0UG5WI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’816b1770-c3eb-11e8-998b-f954012f6ebe’]
संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी कर्वेनगर कोथरुड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलीस कर्मचारी कैलास साळुंके व अजय उत्तेकर यांना कुख्यात गुंड संतोष नातु हा कर्वेनगर येथील भुजबळ बंगला येथे पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. पथकाने या ठिकाणी सापळा रचून संतोष नातु याला ताब्यात घेऊन तीन पिस्टल आणि दहा जीवंत काडतुसे जप्त केली.
संतोष नातु हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून नामचिन गुंड आहे. यापूर्वी त्याचेकडून गुन्हे शाखेने १४  तसेच खडक व भारतीय विद्यापीठ पोलिसांनी प्रत्येकी १ असे एकूण १९ पिस्टल आणि ३७ काडतुसे जप्त केली आहेत. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ, खडक, लष्कर, स्वारगेट पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तेरावे बारत एस. गायकवाड यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला ४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
[amazon_link asins=’B0784D7NFX,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’68bc6d06-c3eb-11e8-a463-f395f7a7b3db’]
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, उत्तम बुदगुडे पोलीस कर्मचारी कैलास साळुंके, अजय उत्तेकर, विवेक जाधव, प्रविण पडवळ, सुनिल चिखले, राजेंद्रसिंह चौहान, विजय गुरव, किरण ठवरे, निलेश शिवतरे, रमेश चौधर, राकेश खुणवे, संभाजी गंगावणे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक उत्तम बुदगुडे हे करीत आहेत.
जाहिरात