2 पिस्तूलांसह सराईत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनीट ३ च्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून २ पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली.

अजय विजय पांचाळ (वय २७, शनिनगर, आंबेगाव बु.) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या युनीट ३ चे पथक गस्त घालत होते. त्यावेळी सदाशिव पेठ येथील एलोरा लॉजजवळ सराईत गुन्हेगार अजय पांचाळ हा पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून लागलीच त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे २ पिस्तूल व ४ काडतुसे मिळून आली. पोलिसांनी त्याच्याकडील पिस्तूले आणि काडतुसं जप्त केली आहेत. त्यांची किंमत १ललाख ४२ हजार रुपये आहे.

अजय पांचाळ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी दत्तवाडी, भारती विद्यापीठ, हवेली, या पोलीस ठाण्यांमध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक निकम, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, तसेच कर्मचारी संतोष क्षीरसागर, दीपक मते, विल्सन डिसूजा, अतुल साठे, संदिप राठोड, शकील शेख, दत्तात्रय गरुड, संदिप तळेकर, गजानन गणबोटे, सुजीत पवार यांच्या पथकाने केली.