home page top 1

गांजा विक्री करण्यासाठी आलेल्यास अटक, १ किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून १ किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर एकजण पसार झाला आहे.

आकाश पोपट कांबळे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी लॉरेन्स पिल्ले याच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या खंडणी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी रामटेकडी जंक्शन चौकाजवळ गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी रिक्षाचालक आकाश पोपट कांबळे याला पकडून त्याच्याकडून १ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला लॉरेन्स पिल्ले याने गांजा दिला असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याविरोधात पोलिसांनी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आय़ुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक आनंद रावडे, निखील पवार, कर्मचारी उदय काळभोर, प्रकाश मगर, महेश कदम, मनोद शिंदे, रमेश गरूड, अमोल पिलाने, फिरोज बागवान, नारायण बनकर यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त –

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

Loading...
You might also like