फॉर्चूनर कार चोरून ती विक्रीच्या प्रयत्नात असलेले दोघे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गोव्यातून फॉर्चूनर कार चोरून तिची बनावट कागदपत्रे तयार करून ती विक्री करण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या यूनीट १ च्या पथकाने अटक केली आहे.

नावेद शमीम शेख (वय. ३० वर्षे, रा. गुलबर्गा कर्नाटक, मुळ सोलापूर) व मजहर बीलाल शेख (सोलापूर) अशी अटक कऱण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील उमर शेख हे वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना नावेश शेख आणि ईश्वर पाटे नावाच्या दोघांनी फॉर्चूनर गाडीची बनावट कागदपत्रे देऊन ती विक्रीच्या बहाण्याने १३ लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केली होती. त्यानंतर याप्रकरणी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनीट १ चे पथक करत होते. त्यावेळी क्रमांकाच्या फॉर्चूनर चोरीचा गुन्हा गोव्याच्या कलंगुट पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघांची माहिती काढून शोध घेतला. तेव्हा दोघेही कोंढवा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास करत फॉर्चूनर गाडी जप्त केली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनीट १ चे पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, कर्मचारी बाबा चव्हाण, योगेश जगताप, श्रीकांत वाघवले, हनिफ शेख, अमोल पवार, प्रकाश लोखंडे, प्रशांत गायकवाड, वैभव स्वामी, अनिल घाडगे, अजय थोरात, सुधाकर माने, बशीर सय्यद, इरफान मोमीन, सुभाष पिंगळे यांच्या पथकाने केली.