चांदणी चौकात बहिणीच्या पतीवर गोळ्या झाडणाऱ्यांना गुन्हे शाखेकडून १२ तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बहिणीच्या पतीवरच चांदणी चौकात गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या भावासह तिघांना गुन्हे शाखेच्या युनीट ४ च्या पथकाने अटक केली आहे.

आकाश लहू तावरे (वय २२), सागर लहू तावरे (वय २४), सागर रामचंद्र पालवे (वय २१, रा. मु. पो. राजे ता. भोर जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर तुषार प्रकाश पिसाळ (वय २०, रा. मु. पो. राजेगाव ता. भोर, जि. पुणे) याच्यावर चांदणी चौकात काल रात्री गोळीबार करण्यात आला होता.

बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग

तुषार पिसाळ याने आकाश तावरे याच्या बहिणीशी लग्न केले होते. त्याचा राग मनात होता. त्यामुळे त्याचा राग मनात होता.  आकाश तावरे, सागर तावरे, आणि विद्या हिचा चुलता राजू तावरे आणि त्यांचा मित्र सागर पालवे यांनी संगनमत करून तुषार पिसाळ याला संपविण्याचा डाव रचला. दरम्यान तुषार काल रात्री चांदणी चौकातून जात असताना दुचाकीवरून चौघे आले. त्यातील राजू तावरे याने त्याच्याजवळील पिस्तुलातून तुषारवर गोळीबार केला. तू मरायलाच पाहिजे म्हणत त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तुषार हा रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान गुन्हे शाखेच्या युनीट ४ चे पथक गस्त घालत असताना पोलीस हवालदार सुनील पवार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गोळीबार करणारे काही जण जंगीली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यान परिसरात थांबलेले आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तेथे सापळा रचून अटक केली.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे सहायक पोलीस आय़ुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजूम बागवान, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, कर्मचारी सुनील पवार, शंकर संपते, विशाल शिर्के, शंकर पाटील, रमेश चौधर, निलेश शिवतरे यांच्या पथकाने केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like