९ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ‘चंदन’चोर अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बंडगार्डन येथील टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटरमधून चंदनाची झाडे चोरून मागील ९ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चंदन चोराला गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली आहे.

अनिल तानाजी जाधव (वय ४१, रा. मु. पो. सुरवडी ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात यापुर्वी विमानतळ, खडक, सांगवी, कोरेगाव (सातारा), श्रीगोंदा, फलटण ग्रामीण या पोलीस ठाण्यांमध्ये चंदनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१० साली मंगलदास रोडवरील टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटरमधून ३ चंदनाची झाडे तोडून नेण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कजन उर्फ जुर्मेश फुटेल, सनद मोहमदलाल राठोड, सोनदलाल भावश्या पठार (सर्व रा. खांडवा, मध्यप्रदेश) यांना अटक कऱण्यात आली होती. तेव्हापासून अनिल जाधव हा पसार झाला होता. तो मागील ९ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

गुन्हे शाखेच्या युनीट चारचे कर्मचारी सचिन ढवळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अनिल जाधव हा फलटण येथे राहण्यास आहे. त्यानंतर पोलिसांनी तेथा सापळा लावून अटक केली. त्याला पुढील तपासासाठी बंडगार्डन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

अप्पर पोलीस आय़ुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, कर्मचारी सचिन ढवळे, शंकर पाटील, गणेश साळुंखे, राकेश खुणवे यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त –

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज