गुन्हे शाखेकडून गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून १ लाख ६० हजार ५०० रुपयाचा १० किलो ८०० ग्रॅम वजनचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (दि.१८) संगमवाडी रोडवर करण्यात आली.

अर्जुन नाना तिमले (वय-२१ रा. दोडाईचा, ता. शिरपुर, जि. धुळे), कोमलसिंग जयसिंग रजपुत (वय-३० रा. सुसदे ता. शहादा, जि. नंदुरबार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आज शहरामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव हे पथकासह शहरामध्ये गस्त घालत होते. गस्त घालत असताना पाटील इस्टेट झोपडपट्टी कडून संगमवाडी कडे जाणाऱ्या रोडवर दोन तरुण संशयितरित्या फिरताना दिसले. त्यांच्याकडे असलेल्या बॅगेची झडती घेतली असता बॅगेत गांजा सापडला. पोलिसांनी गांजा जप्त करुन आरोपींवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदार्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उप निरीक्षक राहुल घुगे, पोलीस कर्मचारी प्रदीप शिंदे, एकनाथ कंधारे, पांडुरंग वांजळे, भाऊसाहेब कोंढरे, प्रकाश मगर, महेश कदम, उदय काळभोर यांनी केली.

You might also like