कोकीनची तस्करी करणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोकीनची तस्करी करण्यासाठी पुण्यात आलेल्या पश्चिम आफ्रिकेच्या इसमाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक आणि परिमंडळ -१ च्या पथकाने संयुक्तीक कारवाई करित अटक केली. त्याच्याकडून २ लाख ७१ हजार ५०० रुपये किंमतीचे ३५ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. ही करावाई कोंढवा येथील दोराबजी मॉलसमोर करण्यात आली.

अहमद उर्फ जॉन ओलोरेड (वय-४३ रा. मुंबई मुळ रा.टोगो, पश्चिम आफ्रिका) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त यांना मुंबई येथील एक व्यक्ती एन.आय.वी.एम रोडने कोंढवा येथील दोराबजी मॉल येथे कोकीन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या व्यक्तीला पकडण्यासाठी गुन्हे शाखचे खंडणी विरोधी पथक आणि परिमंडळ -१ पथक तयार करण्यात आले. या दोन्ही पथकाने दोराबजी मॉल येथे सापळा रचला. त्यावेळी जॉन ओलोरेड हा संशायास्पदरित्या फिरता दिसला. त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ ३५ ग्रॅम कोकीन मिळाले. पोलिसांनी कोकीन आणि गुन्ह्यात वापरलेली अॅक्टीव्हा मोपेड जप्त केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1a6701f4-caf0-11e8-8942-8dd66a0f6ec1′]

ही कारवाई पोलीस उपायुक्त सुहास बावचे, एसीपी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, परिमंडळ १ कार्य़ालयातील पोलीस नाईक जगदाळे, पोलीस हवालदार इनामदार, साळुंके व खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार मते, गायकवाड, मगर, बागवान, बोले यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पोलीस नाईक पालवे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सिगारेटची राख डोळ्यात गेल्याने अपघात झाल्याचे सांगून तरुणाला मारहाण
पुणे : सिगारेटची राख डोळ्यात गेल्याने तोल जाऊन पडलो असल्याचे सांगून बायकोला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तसेच पत्नी गरोदर असून बाळाला काही झाल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन एका तरुणाकडे ८० हजार रुपयांची मागणी करुन ५० हजार रुपये घेऊन फसवणू केली. हा प्रकार वानवडी येथील रिलायन्स मार्टच्या समोर शुक्रवारी (दि.६) दुपारी अडीचच्या सुमारास घडला. याप्रकरणी आशुतोष भोसले (वय-२४ रा. चव्हाणनगर, धनकवडी) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ४० ते ४५ वर्षाच्या एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करित आहेत.

[amazon_link asins=’B0751LYPY3,B078JVYMV1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ec711cf-caf0-11e8-8b51-6f8ddb122240′]