गुन्हे शाखेने अट्टल वाहन चोरांच्या आवळल्या मुसक्या, २० दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे, नाशिक, अहमदनगर, ओतुर जिल्ह्यात वाहन चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ६ लाख १० हजार रुपयांच्या २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अभिषेक उर्फ पांडु अरुण जगधने (वय-१९), वैभव उर्फ पप्पु रामभाऊ शिंदे (वय-२२ दोघे रा. मुपो. धामणगाव, पाट, ता. अकोले, जि. अमहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0c7d2c76-c970-11e8-a192-a18c3412c577′]
गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक पुणे शहरात गस्त घालत असताना आरोपी वैभव आणि अभिषेक हे प्रायव्हेट रोड, ताडीवाला रोड, ससुन हॉस्पिटल येथे वाहन चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रकाश मगर, मंगेश पवार यांना मिळाली. खंडणी विरोधी पथकाने दोन पथके तयार करुन अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली.
[amazon_link asins=’B07B128DX7,B01HQ4O058′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1952b1fe-c970-11e8-9481-6158196648b5′]

आरोपींनी चौकशीदरम्यान नाशिक, ओतुर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातून २० दुचाकी चोरल्याची कबुली दिली. नाशिक शहरातील दोन, संगमनेर येथील ३, ओतुर आणि पुणे जिल्ह्यातून ५ असे एकूण १० दुचाकी गुन्हे उघडकीस आले आहेत. तर १० दुचाकींच्या मालकांचा शोध सुरु आहे. पोलिसांनी चोरलेल्या दुचाकी आरोपी अभिषेक जगधने याच्या गावाजवळून जप्त केल्या आहेत.

एका प्रेयसीसाठी दोन मजनूंचे गट समोरासमोर भिडले

चोरट्यांनी बजाज पल्सर, हिरो होंडा पॅशन प्रो, हिरो होंडा स्प्लेंडर, होरो डिलक्स या दुचाकी मोठ्या प्रमाणात चोरल्या आहेत. ज्या व्यक्तींच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत अशांनी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रमोद मगर (९९२३६९५५१०) यांच्याशी संपर्क साधावा अथवा पुणे गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उप निरीक्षक राहुल घुगे, पोलीस कर्मचारी प्रमोद मगर, धिरज भोर, फिरोज बागवान, महेश कदम, मनोज शिंदे, प्रदीप शिंदे, शिवानंद बोले, संतोष मते, नारायण बनकर यांच्य पथकाने केली.