दरोड्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये २०१७ मध्ये सशस्त्र दरोडा टाकून दागिने आणि पैसे लूटून नेणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली. रवि वैरागर (रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. ही कारवाई दरोडा विरोधी पथकाने मंगळवारी (दि.२०) सेव्हन लव्हज चौकात सापळा रचून केली.

दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी फरार गुन्हेगारांचा शोध घेत होते. त्यावेळी दरोडा विरोधी पथकातील पोलीस हवालदार अनिल घाडगे यांना गुलटेकडी येथील दरोड्यातील फरार आरोपी सेव्हन लव्हज चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने या ठिकाणी सापळा रचून रवी वैरागर याला अटक केली.

रवी वैरागर याने २०१७ साली गुलटेकडी येथील रेखाकौर टाक यांच्या घरात तलवार, हॉकीस्टिक घेवून घुसून टाक यांना मारहाण करुन पैसे आणि दागिने लुटून नले होते. त्याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याला एक वर्षानंतर अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ चे समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस फौजदार बाबा चव्हाण, अनिल घाडगे, विनायक पवार, चेतन गोरे यांच्या पथकाने  केली.