पुण्यातील कोरेगाव पार्कमधील हॉटेलमध्ये चालणार्‍या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील कोरेगाव पार्कच्या उच्चभ्रू भागातील हॉटेलमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. तर या ठिकाणाहून अमेरिकेतली कॅलिफोर्नियात जन्मलेल्या एका मॉडेलची सुटका केली आहे. तसेच तिला सेक्स रॅकेटमध्ये ढकलून देह विक्रय करून घेणाऱ्या दोघा एजंटांना बेड्या ठोकल्या आहेत.

फैजल मेहताब खान (वय २१, रा.वडगाव शेरी मुळ रा. मुरादाबाद उत्तरप्रदेश) व झिशान नौशाद खान (वय २२ वर्षे रा. वडगाव शेरी, मुळ उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

कोरेगाव पार्कमधील बंडगार्डन जंक्शनजवळ पार्क सेंट्रल हॉटेलमध्ये कॅलिफोर्नियात जन्मलेल्या आणि सध्या दिल्लीत राहणाऱ्या एका मॉडेलकडून देहविक्रय करून घेतला जात आहे. अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे कर्मचारी कदम यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकला आणि तरुणीची सुटका केली. तर तिच्याकडून देहविक्रय करून घेणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी ७ हजार रुपये रोख रक्कम व ४ मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला.

मॉडेल कॉलिफोर्निया बॉर्न परंतु दिल्लीत राहते
कोरेगाव पार्क हा उच्चभ्रू परिसर समजला जातो. या परिसरातील हॉटेल पार्क सेंट्रलमध्ये अमेरिकेतली कॅलिफोर्नियात जन्मलेली परंतु सध्या दिल्लीत राहणारी तरुणी आहे. तिच्याकडून फैजल खान आणि झिशान खान हे दोघे देह विक्रय करून घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी येथे छापा टाकला. परंतु हा परिसर उच्चभ्रू असल्याने आंबटशौकिनांसाठी सुरु असलेल्या अशा सेक्स रॅकेटंसचा यापूर्वीही पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे. त्यानंतर आता या मॉडेलची सुटका करण्यात आली असून तिला महंमदवाडीतील रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे. सहायक पोलीस निरीक्षक अनिता खेडकर, नामदेव शेलार, रांजेद्र ननावरे, राजाराम घोगरे, ज्ञानेश्वर देवकर, तुषार आल्हाट, सचिन कदम, सुनील नाईक, रेवनसिध्द नरोटे, सचिन शिदे, संदिप गायकवाड, महिला कर्मचारी कविता नलावडे, गितांजली जाधव यांच्या पथकाने केली.

Loading...
You might also like