Pune : एकाच पोलिस ठाण्यात 18 गुन्हे दाखल असलेल्या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात घरफोडी, चोरीचा प्रयत्न, लुटमार, चेन स्नॅचिंग करणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला अटक केली. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्यावर एकाच पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ गुन्हे दाखल आहेत.

विनायक बंडू कराळे (वय २२, रा. कासेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराईत विनायक कराळे याने वारंवार गुन्हे केले होते. त्याच्यावर या पोलीस ठाण्यात 18 गुुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला खडक पोलिसांनी शहरातून तडीपार करण्यात आले होते. त्यानंतरही तो काशेवाडी परिसरात आल्याची माहिती पोलीस नाईक अमोल पवार याांना मिळाली होती. त्यानुसार त्याला पोलिस उप निरीक्षक हनुमंत शिंदे, अमोल पवार,वैभव स्वामी, बाबा चव्हाण, तुषार माळवदकर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली.