गुन्हे शाखेकडून ७ हुक्का पार्लवर छापे, ५५ जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहर आणि परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अवैधपणे चालवणाऱ्या ७  हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेने छापे टाकून त्या ठिकाणी हुक्का पिणाऱ्या ५५ जणांवर कारवाई केली. ही कारवाई सोमवारी (दि.६) सायंकाळी सहा ते रात्री दोन या दरम्यान करण्यात आली.
[amazon_link asins=’B00KNN4N4I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’059ab842-9af9-11e8-927a-49273c6d26cc’]

गुन्हे विभागातील अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे, आर्थिक व सायबर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोंढवा, मुंढवा, कोरोगांव पार्क, डेक्कन आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरु असलेल्या हुक्का पार्लवर कारवाई केली. ही कारवाई पोलीस ठाणे आणि गुन्हे विभागातील पथकांनी संयुक्तीक रित्या केली.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकने कार्निवल, शिशा, मल्ली बु कॅफे, होली-स्मोक, हुक मी-अप, कॅस्नोव्हा, द व्हिलेज या हुक्कापार्लवर कारवाई केली. कारवाई करण्यात आलेले हुक्का पार्लर हे अवैधपणे चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करुन ५५ जणांवर अंमली पदार्थ कायद्या अंतर्गत कारवाई केली.
[amazon_link asins=’B006RHKER4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0c3675c9-9af9-11e8-8d95-cb3c1330e6de’]

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त गुन्हे ज्योतीप्रिया सिंग, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली विरोधी पथक, गुन्हे, आर्थिक व सायबर  आणि पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी संयुक्तीक रित्या केली.