पुण्यात हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील शिवाजीनगर येथे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असून तेथून पोलिसांनी २० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर एकाला ताब्यात घेतले आहे.

नागेश नामदेव गजघाटे (वय २९, रा. निर्मल नगर, शिवाजीनगर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. तर याप्रकऱणी चतुश्रंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथे निर्मल कॉर्नरप येथे हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी व खंडणी विरोधी पथकाने छापा टाकला.

त्यावेळी तेथे २ जण हुक्का पित असल्याचे मिळून आले. त्यानंतर छाप्यात २० हजार ४०० रुपयांचे हुक्का पिण्याचे साहित्य मिळाले. तर गजघाटे याच्याविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like