पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ३४ जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील मंगळवार पेठेत सुरु असलेल्या अवैध जुगारावर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने ३४ जणांवर कारवाई केली आहे. तर तेथून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी जुगार अड्डा चालविणाऱ्या पाहिजे असलेल्या भिमाशंकर येरप्पा कुंभार याच्यासह ३४ जणांवर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ), ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलासांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील एचडीएफसी बॅंकेसमोर जुगार सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांना मिळाली होती. त्यानुसार खात्री करून सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने तेथे शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. त्यावेळी तेथे रोख रक्कम ३६ हजार ८६० रुपये, ६८ हजार ४०० रुपये किंमतीचे ३८ मोबाईल हॅन्डसेट, १० हजार रुपये किंमतीचे पंती पाकोली जुगाराचे इलेक्ट्रॉनिक मशीन व १०० रुपये किंमतीचे दोन फ्लेक्स असा एकूण १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर त्यावेळी एकूण ३४ जण तेथे जुगार खेळत असल्याचे मिळून आले. जुगार खेळणारे व खेळवणाऱ्या ३४ जणांवर कारवाई करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, महिला सहायक पोलीस निरीक्षक अनिता खेडकर, महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता कुदळे, पोलीस उपनिरीक्षक अनंता व्यवहारे, कर्मचारी प्रमोद म्हेत्रे, नितीन तरटे, नितीन तेलंगे, सचिन कदम, सुनील नाईक, राजेंद्र ननावरे, निलेश पालवे, संदिप गायकवाड, रुपाली चांदगुडे, ननिता येळे, गितांजली जाधव यांच्या पथकाने केली.