शहरात जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे सातारा रस्ता आणि वडगाव बु. येथे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई केली. यावेळी पोलिसांनी कारवाई करत ११ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तर काही जणांना येथून ताब्यात घेतले आहे.

सातारा रस्ता परिसरातून मुसा शेख, आकाश भोसले, जीवन पवार, नितेश पाटोळे, शौकत शेख यांना ताब्यात घेतले. पोलीस हवालादार प्रवीण तापकीर यांनी याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी विरोधात महाराष्ट्र राज्य जुगार कायद्यााअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर सिंहगड रस्ता परिसरातून तानाजी लोंढे, माणिक जाधव, पीरमहंमद सय्यद, डोमनिक जॉन, सुनिल साळुंखे यांना ताब्यात घेण्यात आले.

सातारा रस्त्यावरील लक्ष्मीनाराय़ण थिएटरजवळ सना ट्रॅवल्सचा बोर्ड असलेल्या दुकानात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने तेथे छापा घातला. त्यानंतर पोलिसांनी तेथून मुसा शेख, आकाश भोसले, जीवन पवार, नितेश पाटोळे, शौकत शेख यांना जुगार खेळत असल्याचे आढळून आल्याने ताब्यात घेतले त्यांच्याकडून ४५०० रूपये, जुगार खेळण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तर वडगाव बुद्रुक येथील उड्डाणपुलाखाली एका ओढ्याजवळील पत्र्याच्या शेडमध्ये काही जण मटका खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी याठिकाणी छापा टाकून मटका खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय गायकवाड आणि पथकाने ही कारवाई केली.