पुण्यात १५ सिगारेट विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख १५ हजार रुपयांची सिगारेट जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – इशारा न छापलेल्या परदेशी बनावटीची सिगारेट विक्री करणाऱ्या १५ सिगारेट विक्रेत्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. १४ जणांवर खटले दाखल केले असून १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेतील खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव हे शहरात विमाननगर, येरवडा, चंदननगर, कोरेगाव पार्क, येरवडा, लष्कर, कोंढवा कोथरुड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी या परिसरातील दुकान आणि पान शॉपमध्ये वैधानिक इशारा न छापलेल्या परदेशी बनावटीच्या सिगारेटची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक, युनीट १, युनीट २ यांच्या पथकाने त्या परिसरातील दुकाने व पान शॉपवर छापा टाकून कायदेशीर कारवाई करत १ लाख १५ हजार रुपयांची सिगारेट जप्त केली. तर एकूण १५ जणांवरसंबंधित पोलीस ठाण्यात खटले दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनीट १ आणि २ च्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.