तबलिगी जमात प्रकरणी दिल्ली क्राईम ब्रॅच 536 परदेशी नागरिकांवर 12 नवे आरोपपत्र दाखल करणार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लॉकडाऊनच्या काळात दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये बेकादेशीरपणे एकत्र येऊन कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दिल्ली पोलीस आतापर्यंत ५३६ परदेशी नागरिकांविरुद्ध साकेत कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले आहे. व्हिसा अटींचे उल्लंघन करुन मरकजमधील धार्मिक मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल, बेकायदेशीररित्या धर्मप्रचाराचा उपक्रमांत सहभाग घेतल्याबद्दल आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव केल्याबद्दल बुधवारी २९४ परदेशी नागरिकांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.

मलेशिया, थायलंड, नेपाळ, श्रीलंका आणि अनेक आफ्रिकी देशांसह १४ देशातील हे २९४ परदेशी नागरिक आहेत. त्यांच्याविरोधात १५ दोषारोपपत्रे सादर करण्यात आली आहे. मंगळवारी ८२ परदेशी नागरिकांविरुद्ध २० दोषारोपपत्रे दाखल केली होती. आतापर्यंत ५३६ परदेशी नागरिकांविरुद्ध दोषारोपपत्रे दाखल केली आहे. या सर्व दोषारोपपत्रांमध्ये सुमारे ८ हजार पानांचा समावेश आहे.

महानगर दंडाधिकारी सायमा जमील यांनी या प्रकरणी पुढील सुनावणी १७ जून रोजी ठेवली आहे.
तबलिगी जमातने मार्च महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन भागातील मरकजमध्ये आयोजित केलेल्या धार्मिक मेळाव्यात सहभागी होऊन अनेक मुस्लिम बांधव देशाच्या कानाकोपर्‍यात गेले. त्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रचार होण्यास ते कारणीभूत ठरले होते.