फसवूणक करून लग्न करणाऱ्या पत्नी, मेहुणा, सासू, सासऱ्यांसह अन्य दोघांवर गुन्हा

चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्वीचा पती हयात असताना  संगनमताने फसवून दुसऱ्या तरुणांसोबत लग्न लावून देत दागिन्यांचा अपहार, धमकावून खंडणी मागणाऱ्या व बदनामी करणाऱ्या पत्नीसह तीचे आई-वडिल , भावसाह अन्य दोघांवर चिंचवड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी योगेश  मगर (२९, चिंचवडगाव) याने फिर्याद दिली आहे त्यानुसार पत्नी मोहीणी मगर, वडील नंदकुमार गायकवाड, आई आशु गायकवाड, भाऊ ओंकार गायकवाड (रा.सर्वजण सिंहगड रोड, धायरी फाटा, वडगाव बुद्रुक) यांच्यासह अभिमन्यू पांचाळ, लक्ष्मण दळवी (दोघांचा पत्ता समजू शकला नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक रोहिणी शेवाळे यांनी दिलेली माहिती अशीकी आरोपींनी मुलीचे पूर्वीही लग्न झाल्याची माहिती लपवत फिर्यादी योगेश मगर यांच्याशी तीचे गेल्या वर्षी २४ एप्रिल रोजी लग्न लावून दिले. लग्नानंतर विश्वास संपादन करीत तीने घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला या सर्वांचा जाब विचारायला गेलेल्या पतीची सासरे नंदकुमार गायकवाड यांनीनातेवाईकांमध्ये बदनामी केली, वेळोवेळी धमक्या दिल्या एवढेच काय तर माझी पोरगी नांदव नाहीतर मला २० लाख रुपये दे मी वकील आहे तुला १० वर्षे अडकवून ठेवीन, खडी फोडायला पाठवीन अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली. लक्ष्मण दळवी याने फिर्यादीला फोन करून शिवीगाळ केली राजकीय पुढारी व नेत्यांची नावे घेत

तुला बघून घेतो अशी धमकी देली. फिर्यादी म्यच्युअल घटस्फोटाची मागणी करत असताना त्यांना घटस्फोट न देता या सर्वांनी अडवणूक करून संगणमताने मानसिक त्रास दिला असे फिर्यादीत म्हंटले आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

 

Visit : Policenama.com