महिलांना अश्लील फोन करणारा ‘या’ कारणामुळं आला ‘गोत्यात’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महिलांना फोन करून अश्लिल बोलणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रुग्णवाहिकेच्या सायरनवरून पोलिसांनी आरोपीचा माग काढून त्याला गजाआड केले. आरोपीने एका महिलेला फोन करून तिच्याशी अश्लिल भाषेत बोलताना रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज आला होता. त्याद्वारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक केली.

संतोष देवासी (वय-३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो नेरूळचा राहणारा आहे. त्याच्याविरुद्ध एनआरआय तसेच रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी संतोष याने महिलांचे नंबर मिळवून त्यांना फोन करून त्यांच्याशी अश्लिल भाषेत संभाषण करत होता. तसेच त्यांना अश्लिल मेसेज पाठवत होता. महिलांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना मेसेज पाठवण्यासाठी त्याने स्वतंत्र सिमकार्ड घेतले होते. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

वाशीतील एका महिलेला तो फोन करायचा त्यावेळी रुग्णवाहिकेचा सायरनचा आवाज येत होता. या महिलेने याची माहिती पोलिसांना दिल्यावर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाच्या पोलसांनी पथक तयार करून आरोपींचा तांत्रिक तपास केला. त्यावेळ संतोष देवासी याची माहित मिळाली. त्याची माहिती काढली असता तो नेरुळच्या आपोलो रुग्णालयात रुग्णवाहिकेवर मदतनीस म्हणून कामाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यत घेत सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like