home page top 1

चुकीच्या इंजेक्शनमुळे तरुणाला गंभीर आजार ; पुण्यातील ‘त्या’ नामांकित रुग्णालयावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कार्यालातील पायऱ्यांवरून घसरून पडल्यानंतर कंबरेला दुखापत झाल्याने तरुण रुग्णालयात दाखल झाला. त्याला रुग्णालयात वेदना कमी होण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले. मात्र त्यामुळे त्याला गंभीर आजार होऊन वेदना तसेच मानसिक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी खराडी येथील कोलंबिया एशिया रुग्णालयातील डॉक्टर, ब्रदरसह रुग्णालय प्रशासनावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी करणजितसिंग भट्टि( वय २७,रा.महालक्ष्मी विहार, विश्रांतवाडी) याने दिलेल्या तक्रारीनुसार निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करणजितसिंग हा विमाननगर येथील बीपीओमध्ये नोकरीला होता. १२ जुलै २०१८ रोजी तो कार्यालयामध्ये पायरीवरुन घसरुन पडला. त्यात त्याच्या पाठीला व कंबरेला दुखापत झाली. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी खराडी येथील कोलंबिया एशिया हाँस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी तेथे असलेल्या डॉक्टरांनी त्याला वेदना कमी होण्यासाठी मदतनीस ब्रदरला एक इंजेक्शन देण्यास सांगितले. करणजितला इंजेक्शन दिल्यानंतर डाँक्टरांनी काही गोळ्या लिहून दिल्या. त्यानंतर करणजितचे पालक त्याला घेऊन घरी गेले. परंतु दोन दिवसांनंतर त्याच्या कमरेला मोठी गाठ झाली. त्या गाठीमुळे त्याला वेदना होऊ लागल्या. तसेच त्याला इन्फेक्शन होऊन गंभीर आजार झाला. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात तीन महिने उपचार करण्यात आले. त्यासाठी सुमारे दिड लाख रुपये खर्च झाला. तर त्याला नोकरीलाही मुकावे लागले. त्याच्या पालकांनी याप्रकरणी चंदननगर पोलिसांकडे ३१ जुलै २०१८ रोजी तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या तज्ञ समिती कडून अहवाल मागवला होता.

७ डिसेंबर २०१८ रोजी ससून रुग्णालयाच्या समितीने अहवाल दिले. करणजित याला दिलेल्या इंजेक्शनमुळे गंभीर आजार झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर कोलंबिया एशिया हाँस्पिटचे इंजेक्शन देण्याच्या सूचना देणारे दोन डाँक्टर व इंजेक्शन देणार्‍या ब्रदर व या सर्व गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार्‍या रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ सोडनवार करीत आहेत.

Loading...
You might also like