‘त्या’ तोतया वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल 

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – विधी पदवीधर नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे वकिलीची सनद घेऊन वकिली करणाऱ्या मंगलेश भालचंद्र बापट या तोतया वकिलाविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मगंलेश बापट यांनी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. आर नावंदर साहेब यांचे कोर्टात अटकपूर्व जामीन रद्द होणेबाबत अर्जदार नागेश मारूती मेगडे यांच्यावतीने अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करणेकामी न्यायालयात अर्ज केला होता. सदरच्या अर्जामध्ये युवराज हनुमत नवसरे यांनी न्यायालयात अर्ज करून मंगलेश बापट हे वकील नसतांनाही त्यांनी अर्जदाराच्यावतीने वकीलपत्र दाखल केलेबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये मंगलेश बापट ही व्यक्ती वकिल नसतानाही त्यांनी सन २००१ सालापासून वेगवेगळ्या न्यायालयात व उच्च न्यायालयात वकिल म्हणून काम पाहिल्याबाबत तक्रार केलेली होती.
न्यायालयाने पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी मंगलेश बापट यांच्या वकिलीची सनद व सनद मिळण्यासाठी दाखल केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी दि. २४/१०/२०१८ रोजी आदेश दिलेले होते. त्या आदेशानुसार पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व तपासी अधिकारी श्री. एस.पी. माने यांनी याबाबत सविस्तर चौकशी करून मा. न्यायालयात तसा अहवाल सादर केलेला होता. त्यावर आज रोजी न्यायालयात सुनावणी होऊन सदरची मंगलेश बापट यांनी मिळविलेली वकिलीची सनद व त्या संदर्भात दिलेली कागदपत्रे ही बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
न्यायालयाने आज (दि. 22) रोजी अ‍ॅड. वाय.जी. सुर्यवंशी व अ‍ॅड. जे. डी. पिसाळ व सरकारी पक्षाच्यावतीने अति. सरकारी अभियोक्ता अनिल ढगे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पोलीस निरीक्षक कर्जत पो.स्टे. यांना मंगलेश भालचंद्र बापट यांच्याविरूध्द वकिलीची बनावट सनद व खोटी कागदपत्रे तयार करून लोकांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार सोमवारी (दि. 25) रात्री उशिरा कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई 

त्या हजार जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच 

निवांत झोपा सांगून स्वतःच झोपले ; नेटकऱ्यांकडून पाकिस्तानची फिरकी

भारताचा पाकवर एअर स्ट्राइक : २१ मिनिटे सुरु होता हल्ला 

पाकिस्तानच्या मंत्रालयात तातडीची बैठक सुरु

पाकच्या विमानांनी केला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न 

‘या’ 10 हून अधिक जागांवर भारतीय हवाई दलाने केला हल्ला 

भारत कमजोर देश नाही : मुख्यमंत्री

#Surgicalstrike2 : ‘मांग रहा है हिंदुस्तान खतम कर दो पाकिस्तान’