ॲक्सिस बँकेच्या ‘सीईओ'(CEO), ‘एमडी'(MD)विरुद्ध गुन्हा  

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – रेणुकामाता मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या ॲक्सिस बँकेतील राहुरी शाखेतील खात्यातून आर्थिक अपहार केल्याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2009 ते 2015 दरम्यान 2 लाख 29 हजार 516 रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपींमध्ये ॲक्सिस बँकेत कार्यरत असलेले तत्कालीन राहुरी शाखा व्यवस्थापक, क्लेरिंग कर्मचारी, तत्कालीन विभागीय व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने बँकिंग वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रेणुका माता मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीचे ॲक्सिस बँकेच्या राहुरी शाखेत खाते होते. या खात्यातील मूळ धनादेश संस्थेने रद्द केलेले असतानाही त्या धनादेशाद्वारे आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. नमूद केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम टाकून धनादेश ठेवण्यात आले आहेत. बनावट धनादेशाद्वारे संस्थेच्या खात्यावरील रक्कम परस्पर काढून दोन लाख 29 हजार 516 रुपयांचा आर्थिक पहार करण्यात आलेला आहे. त्यावरून राहुरी पोलीस ठाण्यात रेणुका माता मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश्चंद्र मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके हे करीत आहेत.

ह्याही बातम्या वाचा  –

युतीचा प्रचार ठरला ; ‘या’ शहरात फोडणार प्रचाराचा नारळ