पुणे : जीवनरेखा हॉस्पिटलच्या संचालकांविरुद्ध ‘या’ कारणामुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कचऱ्याचे स्वरुपात असलेल्या वापरलेल्या इंजेक्शनमध्ये मृत अर्भक कचरा गाडीमध्ये जमा करुन मानवी जीवितास धोका निर्माण करणारी कृती केल्याबद्दल देहुरोड पोलिसांनी जीवनरेखा हॉस्पिटलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याने त्याचा फटका हॉस्पिटलच्या संचालकांवर गुन्हा दाखल होण्यात झाला आहे.
याप्रकरणी देहुरोड छावणी परिषद हॉस्पिटलच्या आर एम ओ डॉ. यामिनी अद्वैत अडवे यांनी फिर्याद दिली आहे.

jivanrekha (1)

याबाबत पोलिसांनी सांगितले की, जीवनरेखा हॉस्पिटल येथे एका कचऱ्यांचे गाडीमध्ये एक नवजात अर्भक आढळून आल्याने डॉ. यामिनी अडवे यांना बोलाविण्यात आले. हे अर्भक साधारण १६ आठवड्याचे असून एका प्लॅस्टिकचे पिशवीत ठेवलेले आढळून आले. जीवनरेखा हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र चवाद, डॉ. जयेश कदम यांच्याकडे त्यांनी विचारपूस केली. देहुगाव येथील एका २० वर्षाची महिला २६ जून रोजी पहाटे पोटात दुखत असल्याचे सांगत हॉस्पिटलमध्ये आली होती. यावेळी तिच्यावर उपचारासाठी डॉ. जिमेश मवानी यांना बोलावून घेतले होते. या महिलेवर उपचार सुरु असताना मृत अर्भक बाहेर आल्याचे डॉ. मवानी यांनी सांगितले. व हे मृत अर्भक जैविक विधी करण्यासाठी हॉस्पिटलचे जैव वैद्यकीय भंडारगृह येथे ठेवले होते.

२६ जूनला आरोग्य विभागाचे वाहन न आल्याने त्याची विल्हेवाट लावता आली नाही. २७ जूनला आरोग्य विभागाची कचरा गाडी आली. त्यावेळी जीवनरेखा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी हे मृत अर्भकास कचरा गाडीमध्ये ठेवण्यासाठी गाडीतील कर्मचाऱ्याकडे दिले. कचरा गाडीवर असणारे धनाजी महमुदे यांना मृत अर्भक दिल्याने त्यांनी डॉ. यामिनी यांना कळविले.

मृत अर्भकाची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावायची असताना कचऱ्याचे स्वरुपात असलेल्या वापरलेली इंजेक्शन व इतर वैद्यकीय साहित्यात साधारण १६ आठवड्याचे मृत अर्भक जीवनरेखा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणे कचरा गाडीमध्ये जमा केले. यामुळे मानवी जीवितास धोका असलेल्या रोगाचा संसर्ग पसरु शकतो याची जाणीव असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी जीवनरेखा हॉस्पिटलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. ‘या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळभाजी

पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार