महिलेचा विनयभंग : बीजवडीत एकावर FIR

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यातील बीजवडी येथिल महेश उर्फ देविदास बाळु गेंड (रा.बिजवडी काळेलवस्ती, ता. इंदापूर, जि. पूणे) याने एका 37 वर्षिय महिलेची छेड काढून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सदर महिलेने इंदापूर पोलीसात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी विरोधात इंदापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहीती इंदापूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पठाण यांनी दिली.

याबाबतची सविस्तर माहीती अशी की, गुरूवार (14 नोव्हेंबर) रोजी सकाळी 10:30 वाजताचे सुमारास फिर्यादी महिला ही मौजे बीजवडी, काळेलवस्ती ते राजवडी पाटी भगवान साहेबराव काळेल यांचे शेताजवळुन पायी चालत जात असताना आरोपी महेश उर्फ देविदास गेंड हा मोटारसायकलवरून आला व फिर्यादीजवळ गाडी थांबवून त्याने फिर्यादीचा हात धरला. तु मला लयी आवडतेस, तु विधवा असुन माझेबरोबर संबध ठेव असे म्हनत महिलेची छेडछाड करून विनयभंग केला.

सदर घडलेली घटना कोणाला सांगीतली अथवा पोलीसात फिर्याद दिल्यास तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी आरोपी याने महिलेला देवुन फिर्यादी महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार इंदापूर पोलीस स्टेशनला पिडीत महिलेने दाखल केली. आरोपी महेश उर्फ देविदास बाळु गेंड याचे विरोधात इंदापूर पोलीसात विनभंग केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.

Visit : Policenama.com