पतीचा जीव वाचवण्यासाठी तिनं नराधमांचं ऐकलं, तिघांनी बलात्कार करत काढला ‘व्हिडिओ’

चुरू (राजस्थान) : वृत्तसंस्था – नवऱ्याला कामावरू कमी करण्याची धमकी देत तिघांनी एका महिलेवर सामुहीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील चुरु या शहरात घडली आहे. नराधमांनी या घटनेचा व्हिडीओ काढला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 27 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून सरदारशहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील मुख्यआरोपी बनवारीलाल याने तिच्यावर अत्याचार केले तर शिव भगवान आणि मंगीलाल यांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिघांवरुद्ध सरदारशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडित महिलेवर चूरुच्या सरकारी भरतिया रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, बनवारीलाल याच्या मालकीच्या रोडवेजच्या कंत्राटी बसचा चालक आहे. आरोपींचे त्याच्या घरी येणं-जाणं होतं. 2 सप्टेंबर रोजी शिव भगवान आणि मंगीलाल यांनी नवीन घर दाखवण्याच्या बहाण्याने पीडितेला आरोपीच्या घरी नेलं. या ठिकाणी बनवारीलाल याने नवऱ्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. तर त्याच्या इतर दोन साथीदारांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला.

या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Visit : Policenama.com