Crime Court News | बनावट कागदपत्राच्या आधारे शेत जमीन हडप प्रकरणातील आरोपी शिवा तिवारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला

Pune Crime Court News | Bail denied to woman who cheated crores by performing heinous act like witchcraft
file photo

घाटंजी : पोलीसनामा ऑनलाईन – Crime Court News | बनावट कागदपत्राच्या आधारे तोतया शेतमालक उभा करून करोडो रुपयांची शेतजमीन खरेदी प्रकरणात फसवणूक केल्या प्रकरणी आरोपी शिवा तिवारी (रा. चापमनवाडी), निलेश राठोड, अमजद खान (रा. वाई ता. माहूर) व इतर आरोपी विरूद्ध अपराध क्रंमाक २३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८ (४), ३३६ (२) (३), ३४० (२) व ३ (५) अंतर्गत शहर पोलीसांनी गुन्हे नोंदविले होते.

सदर प्रकरणात आरोपी शिवा तिवारी यांनी ॲड. राजेश साबळे मार्फत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणात यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अमीत लऊळकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. नरेंद्र पांडे यांनी तर, आरोपी तर्फे ॲड. राजेश साबळे यांनी युक्तीवाद केला. शासनाच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राहय ठरवुन आरोपी शिवा तिवारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अमीत लऊळकर यांनी फेटाळून लावला.

दरम्यान, आरोपी शिवा तिवारी याला ड्रग्ज प्रकरणातील गुन्ह्यात या पुर्वी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपीला जामीन मंजूर झाल्याने त्याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी व आरोपी तपास कार्यात सहकार्य करत नसल्याने यवतमाळ पोलीसांनी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे, हे विशेष.

Total
0
Shares
Related Posts