Pimpri News : अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी तिघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी पतीसह त्याच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. काळेवाडी येथे हा प्रकार 2 ऑक्टोबर 2019 रोजी घडला होता. विवाहानंतर मुलगी गरोदर राहिल्याने हा बालविवाहाचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी मुलगा इसकपाण्डी, वडील शंकर मुथ्थू, आई मंगेश्वरी (सर्व रा. मिडल स्ट्रीट, किला थेरू, कोविलम्म पुरम, तामिळनाडू), अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आरोपींना होती. तरीही आरोपींनी संगनमत करून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत इसकपाण्डी याचा विवाह लावून दिला. विवाहानंतर मुलगी 9 महिन्यांची गरोदर राहिली. त्यानंतर बालविवाहाचा हा प्रकार उघडकीस आला. तामिळनाडू येथील नानगुरी येथे एडब्लूपीएस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिथून हा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात वर्ग केला असून आरोपीला अटक करण्यात आला आहे.