जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांना विमानतळावर अडवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तब्ब्ल ८,००० कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या जेट एअरवेजची विमान सेवा सध्या बंद आहे. अशा या आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांना मुंबई विमानतळावर आज परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले. नरेश गोयल हे पत्नी अनिता यांच्यासह अमीरात एअरलाइन्सच्या विमानाने मुंबईतून परदेशात जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांना परदेशात जाण्यास मनाई देखील करण्यात आली आहे.

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांचा गेल्या दोन महिन्यांपूर्वी जेटच्या संचालक मंडळावरुन पायउतार करण्यात आले होते. त्यांनी जेटच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता. २५ वर्षांपूर्वी नरेश गोयल यांनी पत्नी अनिता यांच्यासह जेट एअरवेजची स्थापना केली होती. नरेश गोयल आणि त्यांची पत्नी आज दुपारी अमीरात एअरलाइनच्या विमानाने मुंबईहून दुबईला जाण्यासाठी निघाले होते. विमान टेक ऑफ करण्यापूर्वी इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानातील नरेश गोयल आणि अनिता गोयल या दोन प्रवाशांना विमानातून उतरवण्याचे निर्देश दिले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like