हृदयद्रावक! पती-पत्नीची दगडाने ठेचून हत्या, 1 वर्षापूर्वी झालं होतं लग्न

कानपूर : येथील रेलबाजार लोको मैदानावर सोमवारी पहाटे एक अतिशय निर्घृण आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी एक तरूण दाम्पत्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात दशहतीचे वातावरण पसरले आहे.

रेल्वेमध्ये रंगकाम करणारे आणि मुळ केरळातील बस्ती येथील रहिवाशी असारे रामदीन लोको ग्राउंडमध्ये बांधलेल्या क्वार्टरमध्ये अनेक वर्षांपासून राहात आहेत. त्यांचा मुलगा विष्णू (23) आणि सून शालू (22) हेदेखील रेल्वे मैदानाच्या स्टेशनरी क्वार्टरमध्ये राहात होते. त्यांचे इतर कुटुंब श्यामनगरमधील रामपुरम येथे भाड्याने राहते.

रामदिन यांचा मुलगा विष्णू याने एक वर्षापूर्वी शालूशी विवाह केला होता. शालूचा हा दुसरा विवाह आहे. ती पहिल्या नवर्‍याला सोडून माहेरात मुनशिपुरवा बाबूपुरवा येथे राहत होती. त्यानंतर तिने विष्णूशी विवाह केला. विष्णू हादेखील रंगकाम करत होता.

विष्णू आणि शालू या पती-पत्नीचा अज्ञात व्यक्तीने अतिशय निर्दयीपणे खून केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. हल्लेखोरांनी विष्णूच्या डोक्यात दगड घालून त्यास ठार केले तर शालूचा गळा दाबून तिला मारण्यात आले आहे. शालूचे कपडे आणि घरातील वस्तू अस्तावस्त पडल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मृत शालूच्या अंगावरील दागिने तसेच असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरोडेखोरांनी त्यांना मारले असेल तर त्यांनी दागिने का पळवले नाहीत, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. त्यामुळे पोलिस अन्य दृष्टीकोनातून सुद्धा तपास करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like