गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपी गजाआड; धुळे पोलिसांची कामगिरी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील हद्दपार केलेल्या इसमापेैकी सनी आबा जाधव (वय २३ रा.गायकवाड चौक) यास २ वर्षाच्या मुदतीकरीता धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हयातील अंमळनेर, पारोळा व नाशिक जिल्हयातील मालेगाव तालुका क्षेत्राचे बाहेर हद्दपार केले आहे. त्याने नमुद क्षेत्रात सक्षम पुर्व परवानगी शिवाय प्रवेश करु नये असे नमुद असताना देखील तो धुळे शहरात पारोळा रोडवर गिदोडीया चौक येथे प्रतिबंधित क्षेत्रात कायदेशीर परवानगी शिवाय संचार करताना दिसून आला.

या आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपी विरुध्द मु.पो.का.क. १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येत असून सदर आरोपी हा आझादनगर पोलीस ठाणे येथे गुरन १०२/२०१९ भादवी क. ३९४ इतर व गुरन ९६/२०१८ भादवी क. १४३,१४७,१४८,१४९,३३६ या गुन्ह्यात फरार आहे.

सदर कामगीरी जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.राजु भुजबळ धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे. धुळे शहर विभाग, पो.नि. दिनेश आहेर यांचे मार्गदर्शनाखाली हे.को. डि आर पाटील, पोना एस पी पाथरबट, पोको एस एस बेग, पोको ए आर शेख, पोना आर आर माळी, पोको एस एन भोई, पोना’ एम एच पाटील या पथकाने केली आहे.

Loading...
You might also like