अहमदनगर : कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गाड्या चोरून त्या नंबर बदलून वापरणाऱ्या टोळीतील दोघांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. लिंपणगाव येथील हे तरुण पुण्यात नोकरीला होते. अजिनाथ नवनाथ कुरुमकर (रा.मुंढेकरवाडी,ता.श्रीगोंद) व महेश मुरूमकर राहणार निमगाव ता श्रीगोंदा ही अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील दोन तरुण पुण्यात कामाला असून, त्यांच्याकडील चारचाकी गाड्या ते वारंवार नंबर बदलून वापरत असल्याचे निदर्शनास आल्याचे समजले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी याकामी तपास पथक नेमले. शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर, पोलीस कर्मचारी अंकुश ढवळे पोकॉ, दादासाहेब टाके, किरण बोराडे, उत्तम राऊत, आदित्य बेलेकर यांनी संशयीत अजिनाथ नवनाथ कुरुमकर यास तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे याप्रकारणी चौकशी केली असता, त्याने गुह्याची कबुली दिली. शिवाय त्याचा मित्र याचे साथीने हा गुन्हा केल्याचे अजिनाथने पोलिसांना सांगितले.

मुंढेकरवाडी येथून महेश कुरुमकर यास पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडील मुद्देमाल फिर्यादीचा लॅपटॉप, मोबाईल, एटीम, आधारकार्ड व पाकीट आणि पैसे अंगझडतीतून मिळून आल्याचे श्रीगोंदयाचे (पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून टाटा झेस्टा कार (एम.एच.१२ एन ई ३४४४), ४५०००/- रुपये किंमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप, ७०००/- रुपये किंमतीचा मोबाईल फोन, २०००/- रुपये रोख रक्कम व आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायविंग लायसन असा एकूण ७,५३,०००/- किमतीचा व वर्णनाचा गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांना मिळून आला आहे.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like