Crime in Pimpri Chinchwad | ‘दादागिरी’ करण्यासाठी चिंचवडमध्ये टोळक्याकडून तोडफोड, दरोडा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 8 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड(Chinchwad)मधील मोहननगरमध्ये आम्हीच दादा असल्याचे दाखविण्यासाठी एका टोळक्याने लोकांच्या घराबाहेर ठेवलेली पाण्याचे ड्रम फोडले. घराबाहेर थांबलेल्या एकावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न केला तर दुसर्‍याच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेतली. चिंचवड(Chinchwad)मधील या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या पिंपरी पोलिसांनी १६ जणांवर गुन्हा दाखल करुन त्यापैकी ८ जणांना अटक केली आहे.

राहुल कांबळे, सुशांत ऊर्फ दाद्या शिंदे, स्वप्नील कांबळे, ऋषिकेश महारनवर, राहुल कसबे, ओंकार शिंदे, निलेश उजगरे, राजू शेलार (सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सोन्या कांबळे, मुकुल कांबळे, मोहसीन शेख, नवनाथ शिंदे, सोहम सरोदे, यश गरड, सुजल सूर्यवंशी, सौरी भालेराव व त्यांच्या इतर साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रशांत टकले यांनी फिर्याद दिली आहे.
टकले हे ८ जून रोजी रात्री पावणेसात वाजता घराबाहेर उभे असता.
राहुल कांबळे व त्याचे साथीदार हातात कोयते, सिमेंटचे गट्टु, फरशीचे तुकडे घेऊन मोठमोठ्याने ओरडत आले. मोहननगर आमचे आहे.
आम्हाला सगळ्यांनी दादा म्हणायचे कोणाची हिमंत असेल तर आमच्यासमोर येऊन दाखवा,
त्याचा मुडदाच पाडतो, असे म्हणत आरडाओरडा करत हातातील हत्यारे फिरवत त्यांनी दहशत पसरविली.

हे पाहून गल्लीतील लोकांनी दारे लावून घेतली. या टोळक्याने लोकांच्या दारासमोरील पाण्याच्या ड्रमवर कोयते मारुन ते फोडले. टकले हे घराबाहेर उभे असल्याने पाहून त्याच्याकडे धावत गेले. त्याला शिवीगाळ करुन राहुल कांबळे याने त्याच्याकडील कोयत्याने टकले याच्या मानेवर वार केला. सुदैवाने टकले हे खाली वाकल्याने कोयत्याचा वार घराच्या दरवाजावर बसला. आदेश शिंदे (वय १९) यांना सुशांत शिंदे याने लाथ मारुन खाली पाडले. त्यावेळी नवनाथ शिंदे, स्वप्नील कांबळे, सोन्या कांबळे, राहुल कांबळे यांनी शिंदे यांचे हात व मान पकडली. मुकुल कांबळे याने मारहाण करुन त्याच्या गळ्यातील सोन्याची एक तोळयाची सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेतली.

हे देखील वाचा

Pimpri Crime News : बनावट पॅन कार्ड, आधारकार्ड बनवून तरुणाच्या नावावर 8 फायनान्स कंपन्यांमधून घेतले कर्ज; 8 लाखाची फसवणूक

फायद्याची गोष्ट ! पीपीएफ अकाऊंटमध्ये 10 वर्षाच्या मुलांच्या नावाने दरमहा 500 रूपये जमा करून 28 लाख मिळवण्याची संधी, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Title : Crime in Pimpri Chinchwad | 8 arrested for vandalism, robbery, attempted murder in pimpri chinchwad