धक्कादायक ! वीट कामगाराला खायला लावली ‘विष्ठा’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मुळशी तालुक्यातील जांभे येथील वीटभट्टीवर मानव जातीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वीटभट्टीवर काम करणारा कामगार व मालक यांच्यात कामावरुन शाब्दिक वादावादी झाली. त्यामध्ये मालकाने रागाच्या भरात कामगाराला चक्क विष्ठा खाण्यास भाग पाडले.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अनुसुचित जाती जमाती अत्याचार कायद्याखाली वीटभट्टी मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
संदीप पवार (रा. वाघजाई मंदिराचे पाठीमागे, जांबे, ता. मुळशी) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी एका कामगाराने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कामगार व त्याचे कुटुंबीय पवार यांच्या वीटभट्टीवर कामाला असून तेथेच राहतात. बुधवारी दुपारी हे कामगार जेवण करुन बसले होते. त्यावेळी संदीप पवार हा तेथे आला व काम करायला सुरु करा असे सांगितले. तेव्हा फिर्यादी व त्याचे वडिल यांनी जेवण केले आहे. थोडे बसतो, मग काम सुरु करतो, असे सांगितले.

कामगाराचे हे उलट उत्तर ऐकल्यावर पवार याला राग आला व त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीच्या पत्नीला विष्ठा घेऊन ये नाही तर तुला फावड्याने मारीन अशी धमकी दिली. त्यानंतर पवार याने तुझ्या आईशी संभोग कर नाहीतर विष्ठा खा, असे सांगितले.  मात्र, यावर कामगाराने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मालकाने त्याला मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या कामगाराने विष्ठा खाल्ली व तेथून निघून गेले. बुधवारी दुपारी झालेल्या या प्रकारामुळे हे कामगार कुटुंब भितीने घाबरुन गेले होते. शेवटी गुरुवारी रात्री पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You might also like