पुण्यात खळबळ : ‘उर्मिला’ बाबत अतिशय अश्लील पोस्ट करणाऱ्याविरोधात पुण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बद्दल फेसबुकवर अतिशय अश्लील भाषेत पोस्ट लिहिणाऱ्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. या प्रकाराने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

धनंजय व्यंकटेश कुडतरकर (वय ५७, रा. बुधवार पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. रुपाली चंद्रशेखर पाटील यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.

धनंजय कुडतरकर नावाच्या व्यक्तीने त्याच्या फेसबुक खात्यावर अतिशय अश्लील भाषेत पोस्ट केली आहे. त्याने अभिनेत्री उर्मिलाबद्दल अश्लील भाषेत पोस्ट लिहिल्याने खळबळ उडाली. पुण्यातील महिला कार्यकर्त्यांनी थेट त्याच्या घरावर मोर्चा काढला. त्यानंतर धनंजय कुडतरकर याने पोलीस ठाण्यात धाव घेत संरक्षण घेतले. महिला आक्रमक झाल्या असून याप्रकरणी तक्रार केली आहे. तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्याच्या फेसबुक प्रोफाईलनुसार तो भाजपचा कट्टर समर्थक असल्याचे दिसते. त्याने शरद पवार, सोनिया गांधी आणि इतरांबद्दलही आक्षेपार्ह पोस्ट केल्या आहेत. परंतु त्याने उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल अश्लील भाषेत पोस्ट लिहिल्यानंतर खळबळ उडाली आहे.

सुरुवातीला सुत्रांनी माहिती दिली होती की, त्याला अटक करण्यात आले आहे. पण अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही.

You might also like