Crime in Tasgaon | गुप्तांग छाटलेला अन् डोकं ठेचलेला आढळला होता मृतदेह; तासगाव पोलिसांनी खुनाचं गुढ उकललं

तासगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीसोबत जबरदस्तीने अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याच्या वादातून एकाचा निघृण खून (Crime in Tasgaon) करण्यात आला. आरोपीने मयत व्यक्तीचे डोकं ठेचल, तसेच त्याचे गुप्तांग देखील छाटले होते. मृतदेहाची ओळख पटेल अशी कोणतीच बाब मृतदेहावर नसल्याने तासगाव पोलिसांसमोर (Crime in Tasgaon) या गुन्ह्याचा उलगडा करण्याचे आव्हान होते. पोलिसांनी चार दिवसांत दोन राज्यातील 7 जिल्ह्यांत तपास करुन अखेर आरोपींना पुण्यातून (Pune) अटक (Arrest) केली.

हरी पाटील (रा. मंगसुळी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुनिल राठोड आणि पार्वती राठोड यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट परिसरातून अटक केली. हा प्रकार 10 जुन रोजी घडला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तासगाव-निमणी रस्त्यावरील सुभाष लुगडे यांच्या शेतातील विहरीमध्ये एका पुरुषाचा 10 जून रोजी एक मृतदेह आढळून आला होता. प्लास्टिकच्या कागदात आणि पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी मृतदेहावर वार करुन त्याचे डोके ठेचले होते. तर त्याचे गुप्तांग छाटले होते.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मृतदेहाची ओळख पटवत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, तासगाव नगरपरिषदेचे बांधकामाचे काम सुरु असून तेथील काही लोक बेपत्ता झाले आहेत. पोलिसांनी कामगारांकडे चौकशी केली असता जेसीबी मालक हरी पाटील, जेसीबी चालक सुनील राठोड आणि त्याची पत्नी पार्वती हे बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

विजापूरमध्ये आरोपींचा शोध

पोलीस राठोड दाम्पत्याचा शोध घेत असताना या दोघांचे मुळ गाव विजापूर येथील येलगोडा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या एका पथकाने येलगोडा गावी जाऊन चौकशी केली असता राठोड कुटुंब गावात नसल्याची माहिती समजला. दरम्यान राठोड हा जेसीबी घेऊन पळून गेल्याने पोलिसांनी जेसीबीची कामे सुरु असलेल्या ठिकाणी आरोपींचा शोध घेतला.

पुण्यातून आरोपींना अटक

पोलीस आरोपींचा शोध घेत पुण्यात पोहचले. त्यावेळी आरोपी राठोड पती-पत्नी स्वारगेट परिसरात सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस खाक्या दाखवल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तासगाव पोलिसांनी चार दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

म्हणून केला खून

हरी पाटील याने तासगावात खोदकामाचे कंत्राट घेतले होते. त्याच्या जेसीबीवर सुनिल हा चालक म्हणून कामाला होता. सुनील याला दारुचे व्यसन असल्याचे त्याचा पगार दारुवर उडवत होता. हरीचे सुनिलच्या घरी ये-जा होते. त्यातून त्याने सुनिलच्या पत्नीसोबत जबरदस्तीने अनैतिक संबंध प्रस्थापीत केले होते. हा प्रकार सुनिलच्या लक्षात आल्यानंतर त्याचा हरी सोबत वाद झाला. यातून त्याने कमावर जाणे बंद केले. 8 जून रोजी सुनील आणि हरी यांच्यात पुन्हा वाद झाले. त्यावेळी सुनिलने हरीच्या डोक्यात फावडे मारुन खून केला.

जेसीबीतून घरी नेला मृतदेह

हरीचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह जेसीबीमधून घरी नेला.
घरी गेल्यानंतर सुनिलने घडलेला सर्व प्रकार पत्नी पार्वतीला सांगितले. पार्वती देखील हरीवर चिडून होती.
तिने चाकूने हरीच्या मृतदेहावर वार केले. तसेच त्याचे गुप्तांग कापले. एवढेच नाही तर दोन दिवस मृतदेह घरात ठेवला.
त्यानंतर प्लास्टिकचा कागद आणि पोत्यात मृतदेह बांधून जेसीबीच्या सहाय्याने शेजारच्या विहरीत टाकून जेसीबीसह तेथून पळून गेले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक
रविराज फडणवीस, सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे,
पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सुभाष सुर्यवंशी, अच्युत सुर्यवंशी, जितेंद्र जाधव, संदीप गुरव,
संदीप नलावडे, चेतन महाराज, आबा धोत्रे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, कुबेर खोत, आमसिद्ध खोत,
मच्छिंद्र बर्डे, सतीश आलदर, बजरंग शिरतोडे, मोण्या कार्तियानी, निसार मुलाणी, संदीप पाटील प्रकाश पाटील
महादेव नागणे, शशिकांत जाधव यांच्या पथकाने केली.

Web Title : Crime in Tasgaon | Tasgaon police solve murder case

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्यानं गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

Retirement च्या नंतरसुद्धा EPF खात्यावर मिळू शकते व्याज !
ते सुद्धा विना कॉन्ट्रीब्यूशन, जाणून घ्या कधी आणि कसे?

Pune Crime News | कुख्यात तडीपार गुंड पप्पू वाडेकरचा खून, पुणे जिल्ह्यात खळबळ

Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका,
बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे